श्रीरामपूर | २८.४ | रयत समाचार
(Education) तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा निमगाव येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माता मंदाकिनी तुळशीराम पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्गशिक्षिका मीना निकम यांनी प्रास्ताविकातून समारंभाचा उद्देश स्पष्ट केला.
(Education) यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला एक फॅन तसेच सर्व शिक्षकांना लेखणी भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शाळा व शिक्षकांबद्दलच्या प्रेमभावना व्यक्त झाल्या. शाळेचा सहवास संपत असल्याची जाणीव होताच अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.
(Education) मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका प्रतिभा भिसे, सुधा गमे आणि मीना निकम यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी पुलाव, वडा-पाव आणि जिलेबीचे मिष्टान्न भोजन आयोजित करण्यात आले. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
