कुमारगंज, बंगाल | २३.४ | रयत समाचार
(Politics) पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून, दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुमारगंज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. रा.स्व.संघ भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांना स्थानिक नागरिकांनी संतप्त होत मारहाण करून गावातून हाकलून दिल्याची घटना घडली.
(Politics) मिळालेल्या माहितीनुसार, सुवेंदू सरकार हे प्रचारासाठी कुमारगंज परिसरात गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी विविध प्रलंबित प्रश्नांवर संताप व्यक्त करत त्यांना घेराव घातला. काही वेळातच वातावरण चिघळले आणि जमावाने त्यांच्यावर धक्काबुक्की करत मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत उमेदवाराला तेथून सुरक्षित बाहेर काढले.
(Politics) या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भाजपने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत ही लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तर विरोधकांनी स्थानिकांच्या नाराजीचे हे प्रतिबिंब असल्याचे सांगितले आहे.
बंगालमध्ये निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक पातळीवरील असंतोष आणि राजकीय स्पर्धा यांचा संगम होत असल्याने अशा तणावपूर्ण घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
