अहमदनगर | २४.४ | रयत समाचार
(Cultural Politics) शिवद्रोही आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी आज शुक्रवारी ता.२४ एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथे वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती कॉम्रेड ॲड. सुषाष लांडे यांनी दिली.
(Cultural Politics) आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देणे आणि गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करणे, असे आंदोलनाचे स्वरूप असल्याचे ॲड. सुभाष लांडे यांनी सांगितले.
(Cultural Politics) यावेळी सर्व लोकशाहीप्रेमी नागरिक, शिवप्रेमी संघटना आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
