Literature | न्यायमूर्ती के. चंद्रू लिखित ‘जय भीम’ पुस्तक प्रीबुकिंगला सुरुवात - Rayat Samachar

Literature | न्यायमूर्ती के. चंद्रू लिखित ‘जय भीम’ पुस्तक प्रीबुकिंगला सुरुवात

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

छत्रपती संभाजीनगर | १८.४ | रयत समाचार

(Literature) प्रॉमिथिअस बुक्सतर्फे न्यायमूर्ती के. चंद्रू लिखित ‘जय भीम’ या प्रभावी पुस्तकाचे मराठी भाषांतर आता वाचकांच्या भेटीला येत असून, पुस्तकासाठी प्रीबुकिंगला सुरुवात झाली. समाजपरिवर्तनाच्या विचारांना न्यायव्यवस्थेतून दिशा देणाऱ्या एका धाडसी व्यक्तिमत्त्वाचा प्रवास या पुस्तकातून उलगडतो.

(Literature) न्यायमूर्ती के. चंद्रू हे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून, आपल्या कार्यकाळात त्यांनी तब्बल ९६ हजार खटल्यांचा निपटारा केला आहे. वकील म्हणून त्यांनी १९९३ मध्ये लढवलेला एक ऐतिहासिक खटला नंतर गाजलेल्या ‘जय भीम’ (२०२१) या तमिळ चित्रपटाचा आधार ठरला.

(Literatire) बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यवस्थेत प्रवेश करणाऱ्या व्यक्ती कशा प्रकारे त्या व्यवस्थेला अधिक मानवी आणि न्याय्य बनवू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे के. चंद्रू. त्यांनी वकील आणि न्यायाधीश या दोन्ही भूमिकांतून सामाजिक न्यायाची लढाई सातत्याने आणि निर्भयपणे पुढे नेली.
या पुस्तकाचे मराठी भाषांतर राहुल कोसम्बी यांनी केले असून, मूळ इंग्रजी पुस्तकातील विचारसंपदा मराठीत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि न्यायव्यवस्थेत रस असलेल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
पुस्तकाची माहिती
पुस्तकाचे नाव : जय भीम
लेखक : न्यायमूर्ती के. चंद्रू
भाषांतर : राहुल कोसम्बी
प्रकाशन : प्रॉमिथिअस बुक्स
मूळ किंमत : ₹300/-
सवलतीत किंमत (३० एप्रिलपर्यंत): ₹240/- (टपालखर्चासह). ग्रंथ खरेदीसाठी 7030232506 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणादायी कहाणी अनुभवण्यासाठी ‘जय भीम’ हे पुस्तक वाचकांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading