Cultural politics | मराठीकारणासाठी पुढाकार घेणार का? ‘अंगठे’ दाखवण्याची वेळ आता निघून गेलेली आहे

SubEditor | Dipak Shirasathमराठीकारण : हुतात्मा स्मारकचे संकल्पित चित्र ai

मुंबई |१६.४ | रयत समाचार

मराठी जनहो नमस्कार,

Contents
मुंबई |१६.४ | रयत समाचार(Cultiral politics) मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने महाराष्ट्रभरामध्ये येत्या १ मे रोजी हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेत आहोत. राज्यातल्या शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये ज्या विविध स्वरूपाची हुतात्मा स्मारकं आहेत. तिथं हुतात्म्यांना अभिवादन करावं. जिथं कामगारशक्तीचा प्रभाव दाखवणारी ठिकाणं आहेत तिथे त्यांना अभिवादन करावं आणि अन्यत्र त्या-त्या शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्रं जमून या राज्याला अभिवादन करून महाराष्ट्र गीत सादर करावं. त्यामध्ये सर्व जातिधर्माच्या मराठी भाषकांनी सहभागी व्हावं, असा प्रयत्न आहे.(Cultural politics) मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, पालघर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अशा काही ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते या अभिवादनाचा कार्यक्रम हाती घेत आहेत. अद्याप १५ दिवस तयारीसाठी आहेत. राज्यातल्या ज्या ज्या शहरांमध्ये लोक अशा प्रकारचा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करू इच्छितात, त्यासाठी पुढाकार घेऊ इच्छितात, त्यांनी सोबत दिलेला गूगल फॉर्म भरावा. आपल्याला काही विचारणा करायची असल्यास मराठी अभ्यास केंद्राचे कार्यालयीन व्यवस्थापक अण्णासाहेब चवरे (संपर्क क्रमांक : ९८६०० ९००९४) यांच्याशी संपर्क साधावा. आपण हा अर्ज भरल्यानंतर आठवड्याभरात या संबंधातील नियोजन करण्यासाठी ऑनलाईन बैठक आयोजित केली जाईल. त्यामध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित होईल.जय मराठी जय महाराष्ट्र!आपला,डॉ. दीपक पवारअध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र गूगल अर्जाचा दुवा – https://tinyurl.com/3n6hfab5

(Cultiral politics) मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने महाराष्ट्रभरामध्ये येत्या १ मे रोजी हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेत आहोत. राज्यातल्या शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये ज्या विविध स्वरूपाची हुतात्मा स्मारकं आहेत. तिथं हुतात्म्यांना अभिवादन करावं. जिथं कामगारशक्तीचा प्रभाव दाखवणारी ठिकाणं आहेत तिथे त्यांना अभिवादन करावं आणि अन्यत्र त्या-त्या शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्रं जमून या राज्याला अभिवादन करून महाराष्ट्र गीत सादर करावं. त्यामध्ये सर्व जातिधर्माच्या मराठी भाषकांनी सहभागी व्हावं, असा प्रयत्न आहे.

(Cultural politics) मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, पालघर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अशा काही ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते या अभिवादनाचा कार्यक्रम हाती घेत आहेत. अद्याप १५ दिवस तयारीसाठी आहेत. राज्यातल्या ज्या ज्या शहरांमध्ये लोक अशा प्रकारचा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करू इच्छितात, त्यासाठी पुढाकार घेऊ इच्छितात, त्यांनी सोबत दिलेला गूगल फॉर्म भरावा. आपल्याला काही विचारणा करायची असल्यास मराठी अभ्यास केंद्राचे कार्यालयीन व्यवस्थापक अण्णासाहेब चवरे (संपर्क क्रमांक : ९८६०० ९००९४) यांच्याशी संपर्क साधावा. आपण हा अर्ज भरल्यानंतर आठवड्याभरात या संबंधातील नियोजन करण्यासाठी ऑनलाईन बैठक आयोजित केली जाईल. त्यामध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित होईल.

जय मराठी जय महाराष्ट्र!
आपला,
डॉ. दीपक पवार
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
 गूगल अर्जाचा दुवा – https://tinyurl.com/3n6hfab5

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading