(Politics) तालुक्यातील बारागाव नांदूर येथील शिवाजी चौकात आयोजित संवाद बैठकीत उमेदवार गोविंद मोकाटे यांनी ग्रामस्थांशी मनमोकळी चर्चा साधत आपल्या प्रचाराची दमदार सुरुवात केली. यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोकाटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(Politics) बैठकीदरम्यान ग्रामस्थांकडून विविध प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मांडण्यात आल्या. त्या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून आगामी प्रचाराची ठोस आणि लोकाभिमुख रूपरेखा निश्चित करण्यात आल्याची माहिती गोविंद मोकाटे यांनी दिली.
(Politics) यावेळी बोलताना मोकाटे म्हणाले, ग्रामस्थांनी दिलेला अपार प्रेम आणि विश्वास मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन नवा अध्याय लिहूया.
तसेच, आगामी काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी नागरिकांना साथ आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मोकाटे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.