High Court | न्यायालयातही विखेंचा पराभव; याचिका फेटाळली; लंकेंचा विजय

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

छत्रपती संभाजीनगर | ८.४ | रयत समाचार

(High Court) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या विखे विरुद्ध लंके या कायदेशीर लढतीचा अखेर निकाल लागला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने डॉ. सुजय विखे पाटील यांची निवडणूक याचिका फेटाळून लावली. त्यामुळे न्यायालयीन रणांगणातही डॉ. सुजय विखेंचा पराभव झाल्याचे बोलले जाते. येथेही खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवला.

(High Court) डॉ. विखे पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे विजयी उमेदवार नीलेश लंके यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. या याचिकेत लंके यांनी निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांचा अवलंब केल्याचा आरोप करण्यात आला होता व त्यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

(High Court) या प्रकरणावर दीर्घकाळ सुनावणी सुरू होती. अखेर आज बुधवारी ता. ८ एप्रिल रोजी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या समोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने विखे यांची याचिका फेटाळण्याचा निर्णय दिला.
या निर्णयामुळे नीलेश लंके यांची खासदारकी अबाधित राहणार असून, निवडणुकीनंतर सुरू असलेला हा वाद न्यायालयीन स्तरावरही संपुष्टात आला आहे.
दरम्यान, राज्यातील इतर अनेक निवडणूक याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आल्या होत्या. मात्र, नगर मतदारसंघातील ही याचिका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर आता तिचाही निकाल लागल्याने या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading