Social | माळीवाडा वेस वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात; 17 एप्रिलला निर्णायक सुनावणी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १०.४ | रयत समाचार

(Social) महात्मा व सावित्रीमाई फुले यांना पुढे करून येथील ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रस्तावावरून सुरू असलेला वाद आता थेट उच्च न्यायालयात पोहोचला. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) महापालिकेतील गटनेते दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी जनहित याचिका दाखल केली असून, येत्या १७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

(Social) प्राप्त माहितीनुसार, ही याचिका ता. १० एप्रिल २०२६ रोजी दाखल करण्यात आली. माळीवाडा वेस पाडण्याची चर्चा महापालिकेच्या सभेत करण्यात आली असताना कावरे, बाळासाहेब बोराटे आणि माजी महापौर सुरेखा कदम यांनी त्याला ठाम विरोध दर्शविला होता. मात्र, शहरातील काही नगरसेवक आणि जातीय संघटनांकडून वेस पाडण्याची मागणी करत आहे.

(Social) महापालिकेच्या प्रस्तावानुसार, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याची योजना आहे. यासाठी वेस हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे, अनेक नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून या निर्णयाला विरोध होत असून, ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे; फुले यांचे स्मारक अन्य योग्य ठिकाणी उभारावे” अशी भूमिका इतिहासप्रेमींकडून मांडली जात आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वीही हा वाद न्यायालयात पोहोचला होता. आता पुन्हा एकदा जनहित याचिकेमुळे हा विषय न्यायालयाच्या दारात पोहोचल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली.
१७ एप्रिलच्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे. ऐतिहासिक वारसा की धार्मिकद्वेषाचे राजकारण निर्णय, यावर या प्रकरण अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, या जागेवर ऐतिहासिक माळीवाडा वेस असूनही महानगरपालिका अधिकारी यांनी सरकारला खोटी माहिती देवून, याच जागेवर पुर्णाकृती पुतळ्याचा चुकीचा प्रस्ताव सरकारकडून मंजूर कसा काय करून घेतला? हा संशोधनाचा विषय आहे.
हे ही वाचा : महात्मा फुले समग्र वाड्मय

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading