श्रीगोंदा | ७.४ | रयत समाचार
(Education) तालुक्यातील काष्टी येथील काजल दरेकर- जंजिरे हिने दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पेडगावच्या (मुळ नाव बहादूरगड) संशोधनपत्र सादर करत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला जागतिक मंच मिळवून दिला. तिच्या या कामगिरीमुळे स्थानिक इतिहासाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
(Education) ‘वेळ, प्रदेश आणि भूभाग’ या विषयांतर्गत सादर केलेल्या संशोधनात धर्मवीरगडाचा ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा सखोलपणे मांडण्यात आला. किल्ल्याची स्थापत्यरचना, रणनीतिक महत्त्व तसेच स्थानिक परंपरा आणि लोकजीवनावर झालेला प्रभाव यावर विशेष भर देण्यात आला.
(Education) संशोधनानुसार, गडावरील शिवमंदिरे आणि पाण्याच्या मोटेच्या स्थापत्य शैलीवरून हा किल्ला यादवकालीन असल्याचे स्पष्ट झाले. तसेच इ.स. १६६० मध्ये औरंगजेबाने या गडाचा लष्करी तळ म्हणून वापर करत ‘बहादूरगड’ असे नामकरण केल्याचा इतिहासही या सादरीकरणातून उलगडण्यात आला.
आजही गडाच्या भिंती, बुरुज आणि अवशेष इतिहासाच्या खुणा जिवंत ठेवत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समृद्ध वारशाची आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली गेली.
संशोधनासाठी प्रा. नारायण गवळी, प्रा. नेहा मसालेकर, आय.पी. जंजिरे, सुनील दरेकर, प्रतिभा इंगळे, मच्छिंद्र पंडित आदींचे मार्गदर्शन लाभले.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

