अहमदनगर | ७.४ | रयत समाचार
(Cultural Politics) पुण्यातील डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘डॉ. डी.वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना जाहीर करण्यात आला. युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्सतर्फे आयोजित ‘आकृती २०२५-२६’ या वार्षिक शैक्षणिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन ता. १० एप्रिल रोजी होणार आहे. त्यामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.
(Cultural Politics) शुक्रवारी ता. १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आकुर्डी येथील विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘हंग्री फिल्म्स’चे संचालक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज महेश घरत व प्रसिद्ध कलाकार पराग बोरसे उपस्थित राहणार आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
