World news | 30 हजार कर्मचाऱ्यांना ओरॅकलने केले बायपास; भारतासमोर बेरोजगारीचे नवे आव्हान

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | रयत समाचार

(World news) जागतिक आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडवत Oracle Corporation या महाकाय कंपनीने तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी सेवेतून कमी केल्याची माहिती समोर आली. यामध्ये सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

(World news) कंपनीकडून हा निर्णय घेताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि आर्थिक दबाव हे प्रमुख कारण असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑटोमेशन आणि एआयमुळे अनेक पारंपरिक आयटी नोकऱ्यांची गरज कमी होत असून, जागतिक स्तरावर रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे.

(World news) भारत हा आयटी क्षेत्रातील मोठा मानवसंसाधन पुरवठादार देश असल्याने या घडामोडींचा परिणाम अधिक गंभीर ठरण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी झाल्यास तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, एआयमुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संकटावर मात करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्रितपणे उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. कौशल्यविकास, पुनर्प्रशिक्षण (reskilling) आणि नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण व्यवस्था उभारणे अत्यावश्यक ठरत आहे.
दरम्यान, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले, एआयसारख्या गंभीर विषयांवर चर्चा आणि जनजागृती करण्याऐवजी समाजाचे लक्ष अनावश्यक वादांकडे वळवले जात आहे. हे धोकादायक आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जग आणि भारतासमोर उभ्या ठाकलेल्या रोजगाराच्या संकटावर गंभीर विचारविमर्श आणि ठोस धोरणांची अंमलबजावणी आता अपरिहार्य आहे.
एआयच्या वेगवान प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या संधींसोबतच मोठे धोकेही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, रोजगार संरचनेत होणाऱ्या बदलांना तोंड देण्यासाठी सज्ज होणे हीच काळाची गरज आहे.

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading