Social | महावीर जयंती पदयात्रेत सेवाभावाचे दर्शन; ‘जगा आणि जगू द्या’ संदेशासह 4 हजार थंडपेय वाटप

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३१.३ | रयत समाचार

(Social) महावीर जयंतीनिमित्त नगर शहरातून निघालेल्या भव्य पदयात्रेत महावीर प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभावाचा सुंदर उपक्रम राबविला. प्रतिष्ठानतर्फे सुमारे ४ हजार भाविकांना थंडपेय वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे १६ वे वर्ष असून, आनंदधाम येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता.

Social
छायाचित्र – महेश कांबळे

(Social) उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी पदयात्रेत थंडपेय वाटप केले जाते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष हर्षल बोरा यांच्यासह राकेश भंडारी, अमित फिरोदिया, स्वप्नील मुनोत, आशिष चोपडा, अक्षय मुनोत, आनंद गांधी, दर्शन चाणोदिया, गौरव पोखरणा, निखिल गांधी, रोहित भंडारी, रितेश पारेख, प्रीतम गुगळे, परेश बोगावत, प्रसाद बोरा, रुपेश पटवा, सचिन लुनिया, विशाल पारेख, लक्ष्मीकांत तिवारी, श्रीपाल शिंगी, पुष्कर तांबोळी, चेतन भंडारी, अमोल निस्ताने आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Social) यावेळी बोलताना हर्षल बोरा म्हणाले, महावीर प्रतिष्ठान हे राज्यात सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. गणेशोत्सवात प्रबोधनात्मक देखावे, फिरते अन्नछत्र, तसेच ‘अहिल्यानगर करंडक’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन असे विविध उपक्रम प्रतिष्ठान राबवित असते.
आजचा दिवस जैनधर्मातील अत्यंत महत्त्वाचा असून, भगवान महावीरांचा २६२४ वा जन्मकल्याणक म्हणून साजरा केला जातो. अहिंसा, सत्य आणि ‘जगा आणि जगू द्या’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी शहरात पदयात्रा व मिरवणुका आयोजित करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची सेवा करण्यासाठी थंडपेय वाटपाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे ही वाचा : Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading