Religion | रमजानमध्ये ज्ञानसेवेची हाक; गाजीउद्दीन अकादमीचे सहयोग निधीसाठी आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

सोलापूर | १९.३ | रयत समाचार

(Religion) येथील गाजीउद्दीन अकादमी फॉर डेक्कन स्टडीज या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सहयोग निधीसाठी समाजाला भावनिक आवाहन केले. गेल्या बावीस वर्षांपासून इतिहास आणि संस्कृतीच्या वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या या अकादमीने संशोधन, प्रकाशन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.

(Religion) २०१३ पर्यंत ‘ईदारा बराए मुतालेहा व तहकीक तारीख ए दखन’ या नावाने कार्यरत असलेल्या या संस्थेने आतापर्यंत २० हून अधिक उर्दू आणि १८ मराठी पुस्तकांची निर्मिती केली आहे. तसेच विविध संशोधकांच्या सहकार्याने अनेक ग्रंथ पूर्ण करण्यात आले आहेत.

(Religion) अकादमीकडून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे, युवकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन, तसेच अभ्यास सहली सातत्याने राबवण्यात येतात. याशिवाय सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ५० हून अधिक परिसंवाद, व्याख्याने आणि कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

नव्या काळाशी सुसंगत राहून अकादमीने प्रबोधनासाठी आधुनिक माध्यमांचाही अवलंब केला आहे. दीर्घ व लघु स्वरूपातील माहितीपट (डॉक्युमेंटरी) निर्मिती करून समाजप्रबोधनाची चळवळ अधिक प्रभावी करण्यात आली आहे.

ही सर्व चळवळ प्रामुख्याने रमजान महिन्यात समाजातून मिळणाऱ्या सहयोग निधीवर चालते. यंदाही अकादमीने सर्व समाजबांधवांना उदारपणे योगदान देण्याचे आवाहन केले आहे. विवेकी, समंजस आणि संवादाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आपला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सहयोग निधीसाठी संपर्क व तपशील

• UPI ID : 9503429076@ybl

• बँक खाते नाव : Gaziuddeen Academy

• बँक : Bombay Mercantile Bank

• खाते क्रमांक : 151110100002265

• IFSC: BMCB0000028

 ज्ञान, संस्कृती आणि संवादाच्या चळवळीला हातभार लावा, हीच रमजानमधील खरी सेवा.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading