Social | डिजे’ला नकार, विचारांची जयंती साजरी करण्याचा निर्धार; म.फुले- डॉ.आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी आगम, उपाध्यक्षपदी शिंदे तर खजिनदारपदी गोरे यांची निवड

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कर्जत | ८.३ | रयत समाचार

(Social) तालुक्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव- २०२६ च्या नियोजनासाठी बैठक काल ता. ७ मार्च रोजी पार पडली. या बैठकीत समाजपरिवर्तनाच्या विचारांना अभिप्रेत असा जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.

बैठकीत एकमताने जयंती उत्सवामध्ये डी.जे. न लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. समाजप्रबोधन, विचारपर कार्यक्रम आणि सामाजिक ऐक्य यावर भर देत जयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले.

(Social) यावेळी जयंती उत्सवासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. धनंजय आगम यांची अध्यक्षपदी, मंगेश (बाप्पु) शिंदे यांची उपाध्यक्षपदी तर स्वप्निल (आबा) गोरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. निवड झालेल्या तिन्ही पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

(Social) महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या व प्रबोधनाच्या विचारांना साजेशी जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘विचारांची जयंती साजरी करूया’ या संकल्पनेतून यंदाचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading