Public issue | कडक उन्हात सीएनजी कार धोक्यात? ‘फुल टँक’ ठेवणे ठरू शकते जीवघेणे; रस्ते सुरक्षा व वाहतूक तज्ञ अभिजीत वाघमारे यांचा इशारा

SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १.३ | रयत समाचार

(Public issue) उन्हाळ्याच्या कडाक्यात सीएनजी वाहनधारकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचा इशारा रस्ते सुरक्षा व वाहतूक तज्ञ अभिजीत विठ्ठलराव वाघमारे यांनी दिला. कार दीर्घकाळ वापरात नसताना सीएनजी पूर्ण भरून ठेवणे टाळावे, अन्यथा गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Public issue) वाघमारे यांच्या मते, कडक उन्हात दीर्घकाळ उभी असलेली सीएनजी कार आतून प्रचंड तापते. या तापमानवाढीमुळे सिलिंडरमधील गॅसचा दाब वाढू शकतो. काही प्रसंगी सिलिंडर एक्सपान्शन, व्हॉल्व्हमध्ये बिघाड किंवा गॅस लिकेज यांसारख्या समस्या निर्माण होऊन वाहनाला आग लागण्याचा धोका संभवतो.

(Public issue) अनेक जण कार वापरात नसतानाही सीएनजी पूर्ण भरून ठेवतात. मात्र दीर्घकाळ उन्हात उभे असताना हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. शक्यतो वाहन वापरात नसल्यास सीएनजी कमीतकमी ठेवावे, असा सल्ला वाघमारे यांनी दिला.

कोणती काळजी घ्यावी? तर आपली कार दीर्घकाळ वापरात नसल्यास सीएनजी टँक पूर्ण भरू नये. वाहन शक्यतो सावलीत किंवा पार्किंग शेडमध्ये उभे करावे. सिलिंडर, व्हॉल्व्ह आणि पाइपलाइनची नियमित तपासणी करावी. अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच फिटमेंट व मेंटेनन्स करावे. गॅसचा वास आल्यास त्वरित वाहन सुरू न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असताना वाहनांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः सीएनजी वाहनधारकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

वाहनधारकांनी थोडीशी काळजी घेतल्यास मोठा अपघात टाळता येऊ शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य सवयी अंगीकारणे हीच खरी जबाबदारी असल्याचे अभिजीत वाघमारे यांनी नमूद केले.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading