Literature | मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळीअंक पुरस्कारांचे वितरण; मराठी भाषा गौरवदिनी विचारांचा जागर

दिवाळी अंक परंपरेचा सन्मान

रयत समाचार वृत्तसेवा
9 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १.३ | गुरुदत्त वाकदेकर

(Literature) मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि आत्मभान आहे. शिवरायांच्या पराक्रमासोबत मराठी भाषेने स्वराज्याचा स्वाभिमान जपला. आज जगातील पहिल्या १५ प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मात्र जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेबाबत वाढत चाललेली उदासीनता गंभीर असून तिची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केले. दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

(Literatire) कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनासोबतच दिवाळी अंक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या प्रतिष्ठित ५० व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘मनोरंजनकार’ का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘नवलाई’ दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. प्रभू कापसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उद्योजक अशोक पाटील, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते, चंद्रकांतच्या संपादिका निलिमा कुलकर्णी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, मनोहर साळवी, विकास होशिंग, माजी नगरसेवक मनमोहन चोणकर, ॲड. देवदत्त लाड, संजीव गुप्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.Literature

(Literature) प्रमुख पाहुणे अशोक पाटील यांनी मातृभाषेचे महत्त्व विषद करताना सांगितले, माणसाची मुळे आपल्या मातृभाषेत घट्ट रुजलेली असतील, तरच व्यक्तिमत्त्व सशक्त राहते. मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून ती संस्कारांची, विचारांची आणि संवेदनशीलतेची भाषा आहे. मराठीचा न्यूनगंड बाळगण्याऐवजी तिचा अभिमानाने स्वीकार केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.Literature

दिवाळी अंक परंपरेचा अमूल्य ठेवा जतन करणारे मनमाड येथील शिक्षक अनिल शिनकर यांना दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गेली तीन दशके दिवाळी अंक परंपरेचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांना सुवर्णमुद्रा जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतराव होशिंग स्मृती राज्यस्तरीय लेख स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्णव चव्हाण, द्वितीय मयुर दातार, तृतीय गुरुदत्त वाकदेकर यांना, तर उत्तेजनार्थ डॉ. गौतमी अनुप पाटील, सुनिती सु. काळे व निर्मला गांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले.Literature

राज्यभरातून प्रकाशित होणाऱ्या विविध दिवाळी अंकांमधून उत्कृष्ट संपादकीय दृष्टी, प्रभावी मांडणी आणि साहित्यिक गुणवत्ता या निकषांवर ५० व्या स्पर्धेतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे व कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, राजन देसाई, पास्कोल लोबो आणि रामचंद्र जयस्वाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. आभारप्रदर्शन कार्यवाह नितीन कदम यांनी केले.
मराठी भाषेचे संवर्धन, वाचनसंस्कृतीची वृद्धी आणि दिवाळी अंक परंपरेचे जतन या त्रिसूत्रीवर आधारित हा गौरव सोहळा उपस्थितांमध्ये भाषिक अभिमान जागवणारा ठरला. कार्यक्रमातून मराठी भाषेच्या भविष्याबाबत सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला.Literature

सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंकांचा निकाल :
१. मनोरंजनकार’ का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – नवलाई (कार्यकारी संपादक – प्रभू कापसे, डोंबिवली).
२. चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - सकाळ कोल्हापूर (निखिल पंडितराव).
३. पांडुरंग रा. भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – संस्कारभक्तीधारा (विद्यावाचस्पती कांचन सातपुते, पुणे).
४. पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – जडणघडण (डॉ. सागर देशपांडे, पुणे).
५. पु.ल. देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक -  तरुण भारत नागपूर (शैलेश पांडे, नागपूर).
६. साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक – लाडोबा (घनश्याम पाटील, पुणे).
७. स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक – वेदांतश्री (सुनील उंब्रजकर, पुणे).
८. आवाजकार मधुकर पाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – हंसा (प्रिया बापट, गोवा).
९. मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – अंतरीचे प्रतिबिंब – (प्रज्ञा जांभेकर, मुंबई).
१०. कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक – कोकणसाद (संदीप देसाई, सावंतवाडी).Literature

सुवर्णमुद्रा दिवाळी अंक पुरस्कार :
मौज – मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई (कथाकार अनंत काणेकर स्मृती पुरस्कार).
ऋतुरंग – अरुण शेवते, मुंबई (कवी वसंत बापट स्मृती पुरस्कार).
वसंत – दिलीप देशपांडे, मुंबई (कवयित्री शांता शेळके स्मृती पुरस्कार).
हंस – अभिराम अंतरकर, पुणे (साहित्यिक जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार).
चंद्रकांत आणि धनंजय – श्रीमती नीलिमा कुलकर्णी, मुंबई (गझलकार सुरेश भट स्मृती पुरस्कार).
आवाज – भारतभूषण पाटकर, मुंबई (साहित्यिक प्र.के. अत्रे स्मृती पुरस्कार).
कालनिर्णय – जयराज साळगावकर, मुंबई (साहित्यिक रणजित देसाई स्मृती पुरस्कार).
धनुर्धारी – नंदकुमार सापळे (जयंत नारळीकर स्मृती पुरस्कार).
नवाकाळ – रोहित पांडे, मुंबई (साहित्यिक शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार).
दीपावली – अशोक कोठावळे, मुंबई (साहित्यिक जयवंत दळवी स्मृती पुरस्कार).
मेनका, माहेर, जत्रा – सुमित टेकाळे, पुणे (कविवर्य ग.दि. माडगूळकर स्मृती पुरस्कार).
नवभारत – नीरज हातेकर, वाई (राजारामशास्त्री भागवत स्मृती पुरस्कार).
ग्राहकहित – सूर्यकांत पाठक, पुणे (कवी शंकर वैद्य स्मृती पुरस्कार).
मिळून साऱ्याजणी – गीताली वि मं., पुणे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती. पुरस्कार)
आनंदघन – डॉ. देविदास पोटे, नवी मुंबई (साहित्यिका दुर्गाबाई भागवत स्मृती पुरस्कार).
रंगवाचा – वामन पंडित, कणकवली (साहित्यिक वि.वा. शिरवाडकर स्मृती पुरस्कार).
सत्याग्रही विचारधारा – डॉ. कुमार सप्तर्षी पुणे (साहित्यिक प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार).
अक्षर – मीना कर्णिक, मुंबई (यदुनाथ थत्ते स्मृती पुरस्कार).
एक संक्रमण – रॉकी लोपीस, वसई (कवी नारायण वामन तथा रेव्हरंड टिळक स्मृती पुरस्कार).

उत्कृष्ट अंक २०२५ :
दि म्हसळा टाइम्स – रमेश पोटले, म्हसळा (कवी ना.धों. महानोर स्मृती पुरस्कार).
युगंधरा – सुनीता कावसानकर – संभाजीनगर (साहित्यिक बाबुराव बागुल स्मृती पुरस्कार).
ताऱ्यांचे जग – लता गुठे, मुंबई (श्री.पु. भागवत स्मृती पुरस्कार).
कोकण मीडिया – प्रमोद कोनकर, रत्नागिरी (साहित्यिक ना.सी. फडके स्मृती पुरस्कार).
ठाणे नागरिक – सतीशकुमार भावे, ठाणे (माणिक गोडघाटे कवी ग्रेस स्मृती पुरस्कार).
मनातली जाणीव – सोनल खानोलकर, मुंबई (साहित्यिक वि स खांडेकर स्मृती पुरस्कार).
तारांगण – मंदार जोशी, मुंबई (साहित्यिक व. पु. काळे स्मृती पुरस्कार).
श्री समर्थ विचार – रत्नाकर पाटील अलिबाग (साहित्यिका सरोजिनी बाबर स्मृती पुरस्कार).
इंद्रधनू – विजय पवार, पनवेल (साहित्यिक विजय तेंडुलकर स्मृती पुरस्कार).
क्रिककथा – कौस्तुभ चाटे, पुणे (साहित्यिक चिं.त्र्य.खानोलकर आरती प्रभु स्मृती पुरस्कार).
चतुरंग अन्वय – महेश कराडकर, सांगली (साहित्यिका सुमती क्षेत्रमाडे स्मृती पुरस्कार).
अक्षरमुद्रा – दीपक चिद्दरवार, लातूर (कवी नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार).
पुस्तक मैत्री – मयुरी भवारी, आंबेगाव (इतिहासकार न.र. फाटक स्मृती पुरस्कार).
सह्याचल – अनंत काटकर, परभणी (साहित्यिक श्रीधर व्यंकटेश केतकर स्मृती पुरस्कार).
शब्दपालवी – सुभाष कासार, कल्याण (समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी स्मृती पुरस्कार).
विद्यार्थीहित – चंद्रकांत वामनराव कुलकर्णी, पुणे (कवी विंदा करंदीकर स्मृती पुरस्कार).
शब्दालय – सुमती लांडे, श्रीरामपूर (बलुतकार दया पवार स्मृती पुरस्कार).
रंगबावरी – रजनीश राणे, मुंबई (कथालेखिका गिरीजा किर स्मृती पुरस्कार).
अधोरेखित – पल्लवी अशोक बनसोडे, वसई (साहित्यिक अनिल अवचट स्मृती पुरस्कार).
मोडी दर्पण – सुभाष लाड, मुंबई (इतिहासकार राजा राजवाडे स्मृती पुरस्कार).
आश्रय – विनय गावकर, गोवा (कवी बा भ बोरकर स्मृती पुरस्कार).
बदलते जग – रावसाहेब पुजारी, कोल्हापूर (साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर स्मृती पुरस्कार).
आनंद तरंग – पराग मा पोतदार, पुणे (साहित्यिक नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार).
परममित्र – स्वाती जोशी, ठाणे (कवी दिलीप पु. चित्रे स्मृती पुरस्कार).
समिधा – शैलजा सिंहासने, कराड (नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मृती पुरस्कार).
महावतार बाबाजी दर्शन – दिलीप साठे, मुंबई (कवी सोपानदेव चौधरी स्मृती पुरस्कार).
शब्दगांधार – डॉ. अरविंद नेरकर, पुणे (साहित्यिक गंगाधर पानतावणे स्मृती पुरस्कार).
हेमांगी – प्रकाश कुलकर्णी, मुंबई (कवयित्री इंदिरा संत स्मृती पुरस्कार).
शब्दोत्सव – ॲड. प्रीती बनारसे – रेवणे, अमरावती (कवी बा.सी. मर्ढेकर स्मृती पुरस्कार).
उत्कर्ष – नीलिमा जोशी वाडेकर, पुणे (साहित्यिका मालती बेडेकर स्मृती पुरस्कार).
उद्याचा मराठवाडा – राम शेवडीकर, नांदेड (कादंबरीकार बाबा कदम स्मृती पुरस्कार).
रणांगण – डॉ. अविनाश गारगोटे, नवी मुंबई (साहित्यिक आनंद यादव स्मृती पुरस्कार).
अंतर्नाद – डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर, नाशिक (पं. महादेवशास्त्री जोशी स्मृती पुरस्कार).

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading