Education | उच्च न्यायालयाच्या आदेशाला तंत्रशिक्षण खात्याकडून केराची टोपली? १०० कोटींच्या अपहारप्रकरणी ‘सेव्ह पीईएस’ची कारवाईची मागणी

SubEditor | Dipak Shirasath

Education छत्रपती संभाजीनगर | २७.२ | रयत समाचार

(Education) पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करता तंत्रशिक्षण खात्याने गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप सेव्ह पीईएस (SAVE PES) संघटनेने केला आहे. या प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांच्या अपहाराची शक्यता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(Education) काय आहे प्रकरण : २०१३ मध्ये संस्थेतील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी संचालक, तंत्रशिक्षण यांच्याकडे सोपवली होती. त्यानुसार विभागीय सहसंचालक कार्यालयामार्फत वेतन वितरणाची व्यवस्था राबविण्यात आली आणि ऑक्टोबर २०१७ पर्यंत नियमित वेतन अदा करण्यात आले.
मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन संचालक डॉ. अभय वाघ यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ही व्यवस्था कोणत्याही शासन अथवा न्यायालयीन आदेशाशिवाय गुपचूप थांबविण्यात आल्याचा आरोप आहे.

(Education) ‘देवरे समिती’ अहवालातून उघड : ता. १३ जानेवारी २०२३ रोजीच्या देवरे समितीच्या अहवालातून ही बाब समोर आल्याचे सांगितले जाते. तत्कालीन सहसंचालक डॉ. नागदिवे यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ‘SAVE PES’ने केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये तंत्रशिक्षण खात्याच्या पत्रातून ही धक्कादायक बाब उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या मते, शासन अथवा न्यायालयाचा आदेश नसताना संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २०१७ पासून संचालकांना दिलेले अधिकार स्वतः वापरले. त्यामुळे मागील ९ वर्षांत सुमारे १०० कोटी रुपयांच्या अपहाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जबाबदारी टाळण्याचा प्रकार : तंत्रशिक्षण खात्यातील अधिकारी परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. अभय वाघ हे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष असल्याने संबंधित अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे.
या प्रकरणी डॉ. अभय वाघ, महेश शिवणकर, डॉ. नागदिवे तसेच विद्यमान संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ‘SAVE PES’तर्फे करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर इंजि. अविनाश कांबळे, ॲड. शिरीन वारे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. अमित धबाळे, ॲड. संजय घागरे, ॲड. आकाश मगर, ॲड. आदेशकुमार वाकोडे, ॲड. आकाश जाधव आणि इंजि. नितीन जाधव यांच्या सह्या आहेत.Education
या गंभीर आरोपांमुळे तंत्रशिक्षण विभागात खळबळ उडाली असून, शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading