Crime: मोकाट हल्लेखोर तुषार दामगुडेवर गुन्हा दाखल करून अटक करा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

SubEditor | Dipak Shirsath

शेवगाव | २६.२ | रयत समाचार

Crime: भाजप संबंधित मोकाट हल्लेखोर तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच त्याचा बंदूक वापराचा परवाना त्वरित रद्द करावा. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

याबाबतचे निवेदन भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना देण्यात आले. यावेळी कॉ. बबनराव पवार, दत्तात्रय आरे, ॲड गणेश ताठे, अशोक नजन, राम लांडे, गोरक्षनाथ काकडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले आहे की, भाजपशी संबंधित तुषार दामगुडे व त्याच्या गुंडांनी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचे तुषार दामगुडे याने जाहीर समर्थन केले असून, हनुमंत पवार यांच्यासारख्या कम्युनिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठीच मला कायदेशीर पिस्तूल परवाना मिळालेला आहे असे अत्यंत गंभीर, चिथावणीखोर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वक्तव्य त्याने खुलेआम केले आहे.

या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाला असूनही राज्याचे गृह खाते आणि पोलीस प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही, ही बाब अत्यंत संतापजनक व धोकादायक आहे. सरकारने अशा व्यक्तींना माणसे मारण्याचा परवाना दिला आहे काय, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

यापूर्वीही भाजपाच्या विचारसरणीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्याचे अनेकदा दिसून आले आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचा कट्टर समर्थक करणी सेनेचा राजसिंग अमेरा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहित २५ खासदारांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. अशा प्रकरणांमध्ये केंद्र व राज्य सरकारे तसेच गृह खाती कठोर भूमिका घेत नसल्यामुळे अशा गुंडांचे धाडस सातत्याने वाढत आहे.

तुषार दामगुडे याने हनुमंत पवार याच्यावर हल्ला केला व आता उघडपणे हिंसेचे समर्थन करीत असून, राजकीय मतभेदांवर गोळीबाराची भाषा करत आहे. ही बाब लोकशाही, संविधान आणि कायद्याच्या राज्यासाठी अत्यंत घातक आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षच्या संरक्षणाखाली असे गुंड मोकाट फिरत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे. यावेळी तुषार दामगुडे याच्यावर तात्काळ दखलपात्र कलमांसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला कोणताही विलंब न करता अटक करण्यात यावी. त्याचा पिस्तूल वापराचा परवाना त्वरित रद्द करण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या.

या निवेदनावर तातडीने योग्य ती कारवाई करावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ॲड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.

हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading