सोलापूर | २०.२ | रयत समाचार
(Women) प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’ यंदा हिना खान व साहिल कबीर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने बेन्नूर सरांच्या वैचारिक परंपरेला उजाळा देण्यात आला.
(Women) यावेळी बोलताना साहिल कबीर म्हणाले, प्रा. बेन्नूर सरांनी जपलेला विचारी आणि विवेकी जगण्याचा वारसा पुढे नेणं हे आजच्या काळात जणू काही ‘आगाऊपणा’ करण्यासारखं वाटतं. पण हा आगाऊपणा अधिकाधिक करावा, यासाठीच या पुरस्काराचं बळ मिळतं. त्यांच्या या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
(Women) कार्यक्रमात साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बेन्नूर सरांनी आयुष्यभर जपलेल्या प्रगतिशील विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
प्रा. बेन्नूर यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा केवळ मराठी साहित्यविश्वातच नव्हे, तर सामाजिक भान जागवणाऱ्या चळवळींतही उमटलेला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून, वैचारिक परंपरेचे दायित्व स्वीकारण्याची प्रतिज्ञा आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन बेन्नूर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सभागृहात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
