Rip news | रंगकर्मी उर्मिला लोटके यांचे निधन; रंगभूमीवर शोककळा

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्या, बालरंगभूमीच्या माजी अध्यक्षा 

SubEditor - Dipak Shirasath

अहमदनगर |१९.१ | रयत समाचार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांच्या सहचारिणी, नगरच्या नाट्यचळवळीत सदैव हिरीरीने सहभागी होणाऱ्या रंगकर्मी तथा बालरंगभूमी परिषद, अहिल्यानगर शाखेच्या माजी अध्यक्षा उर्मिला लोटके यांचे आज सोमवारी ता. १९ जानेवारी रोजी रात्री अल्पश: आजाराने निधन झाले. उर्मिला लोटके या अत्यंत मनमिळावू, हसतमुख व रंगभूमीवर निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. नगरच्या नाट्यचळवळीत त्यांनी विविध नाट्यप्रयोग, उपक्रम, बालरंगभूमीच्या चळवळींत सक्रिय सहभाग घेतला होता. बालकलाकारांना रंगभूमीकडे प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले.

त्यांच्या निधनाने नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून अनेक रंगकर्मी, कलाकार व नाट्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पती सतीश लोटके, कुटुंबीय व आप्तस्वकीय असा परिवार आहे.

अंत्यविधी आज सोमवारी ता. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता खंडाळा, दौंड रोड, ता. नगर (अरणगावच्या पुढे) होणार आहेत.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषणप्रदूषण

Share This Article