मुंबई | रयत समाचार
( Entertenment) मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावीन्यपूर्ण प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणारा ‘पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण मुंबईत करण्यात आले. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि निर्माते बलभीम पठारे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.
(Entertenment) यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटाच्या कथा-संकल्पनेविषयी आनंद व्यक्त केला, तर ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी नवोदित कलाकारांचे कौतुक करत चित्रपटाला मनापासून शुभेच्छा दिल्या. या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणारे कश्मीरा रंजन आणि ऋषिकेश वाम्बूरकर हे नवोदित कलाकारही या सोहळ्यात उपस्थित होते. त्यांच्या भूमिकांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी निर्मित केलेला हा चित्रपट पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरी’ वर्ष २०२६मध्ये प्रदर्शित होणार आहे.
(Entertenment) मराठी प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी, तरुणांना भावणारी प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता या पोस्टर अनावरणानंतर अधिकच वाढली.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
