India news | ‘गुरु तेग बहादुरजी, धार्मिक स्वातंत्र्याचे दीपस्तंभ’ ; आंतरधर्मीय संवाद व ऑनलाइन एकता परिषद

उपसंपादक | दिपक शिरसाठ

रयत समाचार – विशेष बातमी

अहमदनगर | १८.११

(India news) अहिंसा, सहिष्णुता आणि परस्पर आदराच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी ‘आंतरधर्मीय संवाद व ऑनलाइन एकता परिषद’ आयोजित करण्यात आली असून यावर्षीची परिषद ‘गुरु तेग बहादुरजी, धार्मिक स्वातंत्र्याचे दीपस्तंभ’ या अत्यंत अर्थपूर्ण विषयावर आधारित आहे.India news

(India news) गुरु तेग बहादुरजी यांनी भारताला दिलेला त्याग, धर्मस्वातंत्र्यासाठीचे अद्वितीय योगदान आणि सर्वधर्मीय बांधवांच्या रक्षणासाठी दाखवलेली करुणा यावर या परिषदेत विशेष चर्चा होणार आहे.

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन तसेच इतर सर्व धर्मीयांच्या प्रमुख नेत्यांना आणि मान्यवर धर्मगुरूंना २ मिनिटांचा लघु व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून पाठवण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

(India news) या संदेशांमध्ये गुरु तेग बहादुरजींचा सार्वत्रिक संदेश, धार्मिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि समाजातील ऐक्याची गरज. या मूल्यांवर भाष्य करण्याची विनंती आहे. प्राप्त व्हिडिओ संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येतील, ज्यातून समाजात बंधुभाव, एकता आणि शांततेचा संदेश पोहोचविणे हा उद्देश आहे.

लघु व्हिडिओ संदेश खालील ई-मेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवावे. Email- [email protected] तसेच WhatsApp- ९४२३१६२७२७ / 9552512344 / 9881770020 आणि Postal Address – घर घर लंगर सेवा, झुलेलाल चौक, तारकपूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र- ४१४००३.

ही परिषद सर्व धर्मांना समान आदर देणाऱ्या भारताच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देणार असून, गुरु तेग बहादुरजींचा सार्वत्रिक संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रभावी उपक्रम ठरणार आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article