Politics | सुरेखा संदिप गुंड यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | ०७.११ | रयत समाचार

(Politics) तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत केकती गणामधून सुरेखा संदिप गुंड, माजी सभापती पंचायत समिती या प्रबळ दावेदार असून त्यांना विजयी होण्याची खात्री आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुलाखती येथील यश ग्रँड हॉटेलमध्ये घेण्यात आल्या. यावेळी मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची उपस्थिती राहिली. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला.

(Politics) सुरेखा संदिप गुंड यांच्या सभापती कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. यामध्ये बचतगटांना ८ कोटीचे कर्जवाटप, खारेखर्जुने येथील गृह संकुलास राज्य सरकारचा प्रथम पुरस्कार, ग्रामीण रुग्णालयास मोठे अर्थसहाय्य मिळालेले आहे तसेच त्यांच्या गणातील सर्व विविध कामे त्यांनी पूर्ण केली आहे.

(Politics) मुलाखतीसाठी खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे संपत म्हस्के, किसनराव लोटके, माधव लामखडे, विक्रम राठोड, बाबासाहेब गुंजाळ, उद्धव दुसुंगे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article