India news | आनंदवारी : महाराष्ट्राच्या वारी परंपरेचा अनोखा अनुभव; छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या नजरेतून

उपसंपादक | दिपक शिरसाठ

बेळगाव | २७.१० | रयत समाचार

(India news) महाराष्ट्राच्या वारी परंपरेतील भक्ती, रंग, आणि सामूहिकतेचा अविस्मरणीय उत्सव आता बेळगावकरांसाठी ‘आनंद वारी’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या रूपात साकारला जाणार आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीतील भावविश्व, भक्तांच्या चेहऱ्यांवर उमटलेली आस्था, पंढरीकडे चाललेली पवित्र पाऊले, हे सर्व अनुभवण्याची संधी बेळगावकरांना लाभणार आहे.

(India news) हे छायाचित्र प्रदर्शन ता. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत के.बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी, लोकमान्य ग्रंथालय (दुसरे रेल्वेगेट, बेळगाव) येथे भरविण्यात आले.

(India news) या कार्यक्रमाचे आयोजन ‘कलावकाश आर्ट फाउंडेशन’ तर्फे करण्यात आले असून, ‘रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम’ या संस्थेचा सहयोग आहे. उद्घाटन समारंभ शुक्रवारी ता. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता होणार असून, उद्घाटनाचे मानकरी असतील ज्ञानेश ओउळकर. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे तर रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. गणेश देवी यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.

India news
छायाचित्रकार – संदेश भंडारे

वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती एक सांस्कृतिक आणि सामाजिक समरसतेची अनुभूती आहे. तिच्यातील आनंद, भक्तीभाव आणि लोकजीवनाचे रंग ‘आनंद वारी’तून प्रकट होतात, असे आयोजकांनी सांगितले.

प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, वारीच्या भावविश्वाचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक वैभव लोकूर ९४८३७९६८९५ / ९९००२६०२४३ यांनी केले.

Share This Article