History | इतिहासभूषण पुरस्काराने डॉ. अशोक राणा यांचा गौरव; अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेकडून होणार सन्मान 

यवतमाळ | रयत समाचार

(History) अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने २०१३ पासून ‘इतिहासभूषण वा. सी. बेंद्रे पुरस्कार’ची परंपरा सुरू ठेवत इतिहास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संशोधकांचा गौरव करण्याची परंपरा कायम राखली. या परंपरेत यंदाच्या २०२५ वर्षासाठी प्रा. डॉ. अशोक राणा, लोकनगर, यवतमाळ यांची निवड करण्यात आली.

(History) इतिहास संशोधन आणि अभ्यास क्षेत्रात डॉ. राणा यांनी केलेल्या योगदानाबद्दल परिषदेकडून त्यांना हा सन्मान जाहीर झाला. या पुरस्कारात प्रशस्तीपत्र, श्रीफळ आणि मानधन म्हणून ७,००० रुपये अशी रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

(History) पुरस्कार वितरण सोहळा अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या ३३ व्या वार्षिक अधिवेशनात, ता. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे.

या गौरवाबद्दल डॉ. राणा यांनी ‘हा सन्मान माझ्या संशोधन प्रवासातील प्रेरणादायी टप्पा आहे. इतिहासाचा अभ्यास केवळ भूतकाळ समजण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या वर्तमानाला दिशा देण्यासाठी आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सचिव प्राचार्य डॉ. सोपान जावळे यांनी हा निर्णय जाहीर केला असून, या घोषणेने इतिहास क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article