Public issue | अपघात टळला अन् नागरिक झाले सावध ! ‘कोतवाली’समोरील ‘आदर्श शाळे’जवळ ‘स्पिडब्रेकर’ची मागणी

अहमदनगर | १४ सप्टेंबर | प्रतिनिधी

(Public issue) शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनसमोरील महानगरपालिकेच्या ‘आदर्श शाळे’समोर तातडीने स्पीडब्रेकर बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. काल ता. १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शाळा सुटल्यावेळी एका विद्यार्थ्यीनीवर दुचाकी धडकणार होती. सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी आवाज उठवला आहे.Public issue

(Public issue) नुकताच माणिक चौक ते आशा टॉकीज या मार्गाचा रस्ता काँक्रीट करण्यात आला आहे. रस्ता गुळगुळीत व चांगला झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारक वेगाने वाहने पळवत असल्याचे दिसते. याच मार्गावर असलेल्या आदर्श शाळेत (सध्या चाँद सुलताना हायस्कूलची प्राथमिक शाळा) पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. शाळा सुटल्यावर लहान मुले धावत बाहेर पडतात, त्याच वेळी वेगात येणारी वाहने धोक्याचे कारण ठरत आहे.

(Public issue) या पार्श्वभूमीवर असिफखान दुलेखान यांच्यासह परिसरातील सजग नागरिकांनी, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने शाळेसमोर स्पीडब्रेकर बसवून वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे. महानगरपालिका बांधकाम विभागाने या तातडीच्या प्रश्नावर त्वरीत उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यातून वाचवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article