नवी दिल्ली | २ जुलै | प्रतिनिधी
(India news) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कर्मचारी संघटना (Archaeological Survey of India Workers Union) यांच्या वतीने ता. २ जुलै रोजी नवी दिल्ली येथील पुरातत्त्व सर्वेक्षण धरोहर भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी देशभरातून कर्मचारी एकत्र आले होते.
(India news) आंदोलनामध्ये मागणी करण्यात आली की, गेल्या १५ ते ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या १/३० दर्जा प्राप्त अस्थायी कामगारांना मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदावर कायम करण्यात यावे. तसेच, गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या दैनिक वेतन कामगारांना १/३० दर्जा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
(India news) संघटनेच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नवी दिल्लीचे अतीरिक्त महानीदेशक (प्रशासकीय) अनंत मधुकर, प्रशासन निदेशक राजेंद्र सिंह खिंची, आणि सेक्शन अधिकारी शुभम गोयल यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे दिल्ली प्रदेश उपाध्यक्ष मुलचंदजी, मंत्री संदीप हापसे, कैलास ठेंगडे, दीपक वेताळ, साईनाथ काळे, योगेश भुसारी, गिरीश कुबडे, बी. बाबू, के. प्रभाकर, संजय ठाकरे, प्रवीण, शिवप्रसाद, बाबूराम, जगदीश गोंगल यांसह विविध राज्यांतून आलेले सुमारे ४० कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. धरणे आंदोलन शांततेत पार पडले असून मागण्यांचा सकारात्मक विचार करून न्याय मिळावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.