मुंबई | २९ जून | प्रतिनिधी
(Cultural Politics) मराठी अभ्यास केंद्राच्या वतने प्रसिद्धीस दिलेली कागदपत्रे व निवेदन.
(Cultural Politics) मित्रहो, ही आहे त्या अन्याय्य शासणनिर्णयांची यादी, ज्यांची होळी आज ता.२९ रोजी आपण करणार आहोत. १. दिनांक १६ एप्रिल २०२५ चा शासननिर्णय ज्यामध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून अनिवार्य करण्यात आली असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. २. दिनांक १७ जून २०२५चे शुध्दिपत्रक ज्यामध्ये अनिवार्य शब्द काढून हिंदी ही सर्वसाधारण तिसरी भाषा म्हणून शिकविण्यात येईल, असे म्हटले आहे. ३. दिनांक ६ जून २०२५ चे राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदचे संचालक आणि आयएएस अधिकार राहुल रेखावार यांनी परिषदेची पाठ्यपुस्तके स्विकारण्याबाबत बालभारतीला लिहिलेले पत्र ज्यामुळे बालभारतीची स्वायत्तताच नष्ट होणार आहे. ४. दिनांक १८ जून २०२५चे राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदचे संचालक आणि आयएएस अधिकार राहुल रेखावार यांनी जाहीर केलेले वेळापत्रक ज्यामुळे कला, क्रिडा या विषयांच्य तासिका कमी करून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यासाठी अधिकच्या तासिका दिलेल्या आहेत.
(Cultural Politics) ही सगळी कागदपत्रे नीट पाहून घ्या. फडणवीस सरकार मराठीचा गळा कसा आवळत आहे, मराठी शाळांमध्ये हिंदीसक्ती कशी करण्यात येत आहे आणि मग त्यांची जाहीर होळी करणं का आवश्यक आहे, त्याची प्रचिती तुम्हाला येईल.
प्रसारमाध्यमांनाही विनंती की, “होळी, होळी” असं सनसनाटी फक्त न करता ही कागदपत्रे दाखवा. त्यातील सरकारी शब्द हायलाइट करून दाखवा. त्यामागचा अर्थ लोकांना सांगा आणि मग ही होळी करणं का आवश्यक आहे, ते ही लोकांना समजावून सांगा.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता



