Politics | आरती उफाडे यांचा मनसेत प्रवेश; मनपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | २० जून | प्रतिनिधी

(Politics) सावेडी परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर सचिव आरती उफाडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) जाहीर प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीने प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

 

(Politics) यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात मनसे महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अनिता दिघे यांनी उफाडे यांना पक्षाचा पारंपरिक पंचा घालून औपचारिक स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अनिता दिघे, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, संदीप चौधरी, किरण प्रशांत रोकडे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत शियाळ, विभागाध्यक्ष प्रशांत जाधव, प्रविण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

(Politics) यावेळी बोलताना आरती उफाडे म्हणाल्या, मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी विचार यासाठी मी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेत प्रवेश केला आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी मी मनापासून मेहनत घेईन.

 

या प्रवेशाचे स्वागत करताना ॲड. अनिता दिघे म्हणाल्या, आरती उफाडे यांचे महिलांमध्ये मोठे संघटन आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मनसेला आगामी मनपा निवडणुकीत निश्चितच बळकटी मिळेल.
नगरच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उफाडे यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महिला नेतृत्व बळकट करण्याच्या दृष्टीनेही ही घडामोड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Politics

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *