Public Issue | सागरी किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा; बोटींना समुद्रात जाण्यास बंदी - Rayat Samachar

Public issue | सागरी किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा; बोटींना समुद्रात जाण्यास बंदी

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | १९ जून | प्रतिनिधी

(Public issue) राज्यातील ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांमध्ये आज दिनांक १९ जून रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत समुद्रात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

(Public issue) ही माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली असून, या कालावधीत लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

- Advertisement -
(Public issue) संबंधित जिल्हा प्रशासनांना खबरदारीचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी समुद्राच्या दिशेने जाणे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading