सातारा | १९ जून | प्रतिनिधी
(education) रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांची रयत सेवक संघाचे प्रतिनिधी काकासाहेब देशमुख यांनी ता.१८ रोजी सदिच्छा भेट घेऊन संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले. शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना आधुनिकतेची जोड देण्याच्या या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले.
(education) यावेळी रयत सेवकांच्या बदल्यांसंदर्भात सेवक संघाने मांडलेल्या विनंत्या संस्थेने मान्य केल्याबद्दल देशमुख यांनी आभार व्यक्त केले. अजूनही काही सेवकांची गैरसोय शिल्लक असून, त्यांच्या बदल्याही लवकरच सोयीस्कर पद्धतीने करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
(education) या बैठकीत चेअरमन दळवी यांनी संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीबाबत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून मोलाचे मार्गदर्शन केले. रयत सेवकांच्या कष्टांची त्यांनी दखल घेत स्तुतिसुमने उधळली.
“सेवकांच्या हितासाठी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर चेअरमन साहेबांनी समाधानकारक चर्चा करत उपयुक्त मार्गदर्शन केले,” असे प्रतिपादन काकासाहेब देशमुख यांनी यानंतर दिलेल्या माहितीत सांगितले.
रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक नामवंत शैक्षणिक संस्था असून, तिच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत आहे. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी रयत सेवक संघ आणि संस्थेचे नेतृत्व सातत्याने प्रयत्नशील आहे.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
