Public issue | देशात इंधन मुबलक, लॉकडाऊनचा प्रश्नच नाही- हरदीपसिंह पुरी; मोदी सरकारची स्पष्ट भूमिका

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | २७.३ | रयत समाचार

(Public issue) देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्याबाबत कोणतीही कमतरता नसल्याचे मोदू सरकारमधील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे. इंधन साठा आणि वितरण व्यवस्था सुरळीत असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

(Public issue) तसेच, लॉकडाऊन लागू करण्याबाबत सरकारच्या स्तरावर कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचीही त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे देशात लॉकडाऊनची शक्यता नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

मंत्री पुरी यांनी सांगितले की, देशातील तेल कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण साखळी मजबूत आहे. त्यामुळे इंधनाच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

(Public issue) सध्या काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात इंधन तुटवडा नाही आणि लॉकडाऊनची शक्यता नाही, सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading