World news | शाश्वत विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल- अजित पवार; भारतातील पहिली ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड लिस्टिंग’

पिंपरी-चिंचवड मनपाच्या 'ग्रीन म्युनिसिपल बाँड'ची BSE वर यशस्वी लिस्टिंग

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

मुंबई | ११ जून | प्रतिनिधी

(World news) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बाँडच्या लिस्टिंगचा भव्य उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

World news
बीएसईच्या मंचावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत मान्यवर

(World news) ही भारतातील पहिली ग्रीन म्युनिसिपल बाँड लिस्टिंग असून, पर्यावरणपूरक व शाश्वत शहरी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हरित पायाभूत सुविधांच्या उभारणीत गुंतवणूक करू शकेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

World news
ग्रीन बाँडच्या लिस्टिंगनिमित्त सन्मान स्वीकारताना पदाधिकारी
(World news) यावेळी अजित पवार म्हणाले, “ही एक ऐतिहासिक घडी आहे. या उपक्रमामुळे राज्यातील इतर महानगरपालिकांनाही नवा आदर्श मिळेल. पर्यावरणाचा समतोल राखत आर्थिक विकास साधणे, ही काळाची गरज आहे.”
World news
समारंभाला उपस्थित पाहुण्यांचे टाळ्यांनी स्वागत
कार्यक्रमात बीएसईच्या घंटानादासह लिस्टिंगचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *