(Education) सिद्धार्थनगर येथील पंचशिल विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे संस्थापक व माजी मुख्याध्यापक, तसेच फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील सक्रिय मार्गदर्शक कालकथित दा.भि. गायकवाड गुरूजी यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(Education) हा कार्यक्रम शनिवार, ता. २४ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, सिद्धार्थनगर (अहमदनगर) येथील पंचशिल विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
(Education) गायकवाड गुरूजी हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे कार्यकर्ते होते. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला सक्षम करण्याचा त्यांनी अविरत प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वात पंचशिल विद्यालय शिक्षण व मूल्यांची पाठशाळा ठरले. समाजात असमानतेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अनेक विद्यार्थ्यांना नवदिशा दिली. ते संपादक भैरवनाथ वाकळे यांचे गुरु होते.
गायकवाड गुरूजींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत सामाजिक सलोखा, समतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जयंत गायकवाड व सुमेध गायकवाड यांनी केले आहे.