अहमदनगर | १ मे | ऋषिकेश राऊत
(Cultural Politics) सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था महासंघ व परशुराम प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित ऋग्वेद भवन, चितळे रोड ते रेणुका माता मंदिर, प्रोफेसर कॉलनी चौक अशी दुचाकी रॅली तर रेणुकामाता मंदिर ते भिस्तबाग चौक अशी पायी शोभायात्रा काढण्यात आली.
(Cultural Politics) शोभायात्रेमध्ये सजविलेल्या अश्वरथावर भगवान परशुरामांच्या पादुका, उत्सवमूर्ती व सजवलेली प्रतिमा ठेवण्यात आली होती. अश्वारूढ झालेल्या ब्राह्मण भगिनी, पुरुष, ब्रह्मवृंद, सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, प्रभाताई भोंग, वे.शा.सं. निसळ गुरू, अतुल शुक्ल, श्रीया देशमुख, सार्थक भोंग, राजाभाऊ जोशी, किरण वैकर, अरुण आवटी, शिरीष देशपांडे, अशोक कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, कालिंदी केसकर, सुवर्णा महापुरुष, कांचन तांबोळी यांच्यासह अनेक परशुराम भक्त, तुतारी पथक, अब्दागिरी, भालदार, चोपदार, बँड पथक, शंखनाद पथक सहभागी झाले होते.
(Cultural Politics) दिल्लीगेट येथून निघालेली ही मोटार सायकल रॅली बालिकाश्रम मार्गे भुतकरवाडी, लेंडकर मळा, शिवरत्न जिवबा महाले चौक (प्रेमदान चौक) मार्गे सावेडीतील रेणुकामाता मंदिरात पोहोचली.
भगवान परशुरामांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी बुधवारी सायंकाळी परशुराम भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा सडासम्मार्जन करून सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. त्याचबरोबर भगवान परशुरामाच्या पादुका व उत्सव मूर्तीचे पूजन व औक्षण करीत रथावर पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
भगवान परशुरामांचे जन्मस्थळ असलेल्या जाणापाव (इंदोर, मध्य प्रदेश) येथून भार्गव दर्शन यात्रेच्या माध्यमातून आलेल्या पादुका परशुराम भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर भगवान परशुरामांची उत्सवमूर्ती व रेणुका माता यांची भेट घडविण्यात आली. रेणुका माता मंदिर येथे अध्यक्ष मोहन कामत, प्रताप सर यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर रेणुका माता मंदिरापासून भिस्तबाग चौकापर्यंत पायी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला व भगवे नेहरू शर्ट व पायजमा असा वेष परिधान केलेले परशुराम भक्त, हातात भगवे झेंडे घेतलेले युवक-युवती देखील सहभागी झाल्या होत्या. तुतारीच्या निनादात, बँडच्या तालावर भगवान परशुरामांची गाणी म्हणत व “जय परशुराम, जय परशुराम” अशा घोषणा देत ही शोभायात्रा भिस्तबाग चौकात येऊन पोहोचली.
यावेळी रेणुकाताई निसळ यांचे प्रवचन झाले. आपल्या प्रवचनातून त्यांनी भगवान परशुरामांचे चरित्र सारांश रूपाने कथन केले. जन्मोत्सव सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रधानाचार्य वेदमूर्ती सिद्धेश्वर निसळ व प्रातिनिधिक स्वरूपातील परशुराम भक्तांच्या हस्ते भगवान परशुराम व श्री गणेशाची आरती करण्यात आली.
कार्यक्रमास नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, संपत नलावडे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, निखिल वारे, गोविंद जोशी, मनोज जोशी, प्रभावती भोंग यांच्यासह अनेक हिंदी भाषिक ब्राह्मण उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक हिंदी भाषिक ब्राह्मण परिवार प्रथमच सहभागी झाले होते. राजाभाऊ पोतदार यांनी प्रास्ताविक केले. यशवंत आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर विजय देशपांडे यांनी आभार मानले.
भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सकल ब्राह्मण सेवा संघ महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, अतुल शुक्ल, श्रिया देशमुख, किरण वैकर, नरेंद्र श्रोत्री, शिरीष देशपांडे, अनंत कुलकर्णी, प्रभाताई भोंग, प्रमोद कुलकर्णी, योगेश दाणी व हिंदी भाषिक ब्राह्मण संस्था आदींनी परिश्रम घेतले.
पाकिस्तानी दहशदवाद्यांना पहेलगाम मध्ये केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा राष्ट्रध्वज दिल्लीगेट परिसरातील रस्त्यावर टाकून पायदळी तुडविण्यात आला. यावेळी “पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद” अशा घोषणा देत युवकांनी भगवा ध्वज फडकाविला.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.