मुंबई | ३० एप्रिल | गुरूदत्त वाकदेकर
(India news) दै.रयत समाचारसह अनेक वृत्तपत्रांमधे सामाजिक विषयांवर लिहिणाऱ्या गोवास्थित स्तंभलेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा एस. गावकर यांना दि सोसायटी ऑफ जिप्सी संस्थेचा मानाचा BEST SOCIAL WORKER OF THE YEAR 2025 चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार ता.२९ एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. मुंबईतील माटुंगा येथे पेन्सवल्डचे संचालक जो पेन यांच्या हस्ते गावकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते विजय गोखले, ‘नटसम्राट’चे भालचंद्र उसगावकर उपस्थित होते.
(India news) दि सोसायटी ऑफ जिप्सी ही संस्था मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई आणि भारत सरकारच्या निती आयोगाची मान्यताप्राप्त आहे. सोशल हेल्पिंग फौंडेशनचे संस्थापक राजेश के. आणि दि सोसायटी ऑफ जिप्सीचे संस्थापक अनंत अंकुश यांनी विशेष सन्मान करत पुरस्कार प्रदान केला.
(Indian news) यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल प्रभाकर ढगे आदींनी अभिनंदन केले. सुवर्णा गावकर यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.