Culture | 19 फेब्रुवारीला ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’तर्फे भव्य शिवजयंती उत्सव; मांडवगणमधे कीर्तन, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन - Rayat Samachar

Culture | 19 फेब्रुवारीला ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’तर्फे भव्य शिवजयंती उत्सव; मांडवगणमधे कीर्तन, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

rayatsamachar
1 Min Read

श्रीगोंदा | १८.२ | रयत समाचार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी ता.१९ फेब्रुवारी रोजी मांडवगण येथे भव्य आणि प्रबोधनात्मक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने एस.टी. स्टँड परिसरात सकाळी १० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या मूर्ती पूजनाने होईल. यानंतर शिवव्याख्यान आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून, ह.भ.प. कबीर महाराज अतार हे शिवचरित्रावर आधारित कीर्तनातून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देणार आहेत.

शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करून ‘चला संकल्प करूया, सातत्याने रक्तदान करूया’ हा संदेश देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आणि अल्पदरात चष्मा वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उत्सव अधिकाधिक शिवप्रेमींनी उपस्थित राहून यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading