अहमदनगर | १४ एप्रिल | प्रतिनिधी
(Social) शरीर चांगले असेल तर आपल्या हातातून सर्व काही घडत असते. शरीरातला एखादा जरी अवयव व्यवस्थीत नसला तरी मनुष्याला जीवन जगणे अवघड असते. दृष्टीहीन मनुष्याला देवाने निर्माण केलेले सौंदर्यही तो पाहू शकत नाही. मात्र एखाद्याच्या नेत्रदानाने त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेत्रदान व अवयवदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज अशिया यांनी केले.
(Social) फिनिक्सतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी नेत्रदान, अवयवदाना विषयी जनजागृती करत त्याबाबतचे संकल्प पत्राचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.पंकज अशिया यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, इजि.परिमल निकम, अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय सावळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
(Social) पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.अशिया म्हणाले, आज देशात लाखो रुग्ण नेत्र व अवयवासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी फिनिक्स फौंडेशनच्या वतीने आज डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेत्रदान व अवयवदानाची जागृती करत सामाजिक उपक्रम राबविले. त्यांच्या उपक्रमाने अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळेल, असे सांगितले.
यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, नेत्रदान व अवदान आज काळाजी गरज ओळखुन फिनिक्स फौंडेशनने राबविलेले उपक्रम स्तुत्य आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या औचित्याने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृतीमुळे प्रतिक्षेत असलेल्या गरजु रुग्णांना याचा लाभ मिळेल. फिनिक्सच्या कार्याला मनपा नेहमी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले, फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदानाची समाजाला असलेल गरज स्पष्ट करून, नागरीकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. फिनिक्सच्या माध्यमातून आजपर्यंत राबवित असलेल्या नेत्रदान व अवयवदान चळवळीमुळे अनेक प्रतिक्षेत असलेल्या गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.