मुंबई | ११ एप्रिल | प्रतिनिधी
(India news) आज ता. ११ व १२ एप्रिलला महात्मा फुले जयंतीदिनी आमचे ‘फुले – आंबेडकरी विचारांचे मित्र, कवी व दलित पँथरचे एक संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ’ महाराष्ट्र शासन व अन्य संस्थांच्या सहकार्याने ‘समष्टी’चा सांस्कृतिक उत्सवाचा कार्यक्रम मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेत आहेत.
(India news) ज्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पुरोगामी शायर, पटकथाकार, संवादलेखक जावेद अख्तरपासून, संपादक, पत्रकार ज्ञानेश महाराव, राजू परुळेकर ते आंबेडकरी कवयित्री लेखिका डॉ.श्यामल गरुडपर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
(India news) जे सेन्सॉरबोर्ड कोण नामदेव ढसाळ? असा सवाल विचारते, त्या नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन आमचे मित्र, कलावंत अक्षय शिंपी, चिन्मयी सुमित, निरजा, प्रज्ञा दया पवार, युवराज मोहिते आदी करणार आहेत. या कार्यक्रमातील अन्य सत्रातही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
माझा या सर्व मान्यवरांना व समष्टी’च्या मुख्य आयोजकांना हा जाहीर सवाल आहे की, ते या कार्यक्रमात ज्या शासनाने नेमलेल्या सेन्सॉरबोर्डाने, नामदेव ढसाळ यांची कविता असलेल्या दलित अत्याचारावरील महेश बनसोडे यांच्या ‘चल, हल्ला बोल’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देणे नाकारले व सार्वजनिक प्रदर्शनापासून रोखले, ज्याबाबतीत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला असता, त्याबाबत सांस्कृतिक मंत्र्यांनीही समाधानकारक खुलासा केला नाही.
दुसरीकडे आता भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांच्या आदर्श जीवन चरित्रावरील चित्रपट, जो त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता. त्यालाही शासनाच्या याच सेन्सॉर बोर्डाने कुणा पुण्यातील, (ब्राह्मण सभेच्या) पेशव्यांच्या जातीय, धर्मांध पुरस्कर्त्याच्या, तक्रारीवरून प्रदर्शन करण्यापासून रोखण्याचा नीचपणा केला आहे. आणि सेन्सॉर बोर्डानेही त्याला कुठलाही विचार न करता माना डोलावून संमती दिली आहे.
माझा सवाल या मान्यवरांना व कार्यक्रम आयोजकांना आहे की, जे स्वतःला पुरोगामी, फुले- आंबेडकरी म्हणवितात, ते तरी वरील कार्यक्रमात शासनाचा व सेन्सॉरबोर्डाचा जाहीर निषेध करणारा ठराव मांडणार का?
का नुसत्याच, “हाण सख्या हाण, तुझीच बारी, लोकशाही मेली तर डेंगण्या मारी…” अशा टाळ्या घेणाऱ्या नामदेव ढसाळच्या कविता वाचून वा त्याचं चित्रप्रदर्शन भरवून स्वतःची पाठ थोपटून घेणार?
अर्थात माझा वरील सवाल या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांपुरताच मर्यादीत नाही तर, आज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीउत्सव साजरे करणारे जे पुरोगामी समतावादी, फुले- आंबेडकरी, लोकशाही विचारांचे म्हणविणाऱ्या सर्वाना आहे.
ते जाहीरपणे शासनाचा, सेन्सॉर बोर्डाचा वरील संदर्भात जाहीर निषेध करणार का?
१) सुबोध मोरे – लोक सांस्कृतिक मंच, जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती. २) भैरवनाथ वाकळे, संपादक, दैनिक रयत समाचार, अहमदनगर
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.