शेवगाव | १८ जानेवारी | ऋषीकेश काळे
(Economi) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून (उमेद) शेवगाव पंचायत समितीच्या अंतर्गत शेवगाव तालुक्यातील भगुर येथील चैतन्य महिला बचतगट यांना उमेदच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून ९ लाख २० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
(Economi) शेवगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांच्या अध्यक्षतेखाली उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासनाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये उमेदच्या माध्यमातून गरजूवंत, एकल विधवा महिलांचे समूह स्थापन करण्यात आले. महिलांना खेळते भांडवल म्हणुन शासनाकडून ३० हजार रुपये निधी दिला जातो तसेच सर्व समूहाचा मिळून एक ग्रामसंघ तयार करतात. ग्रामसंघाच्या वतीने ६० हजार रुपयांचे निधी पण त्या समूहाला दिला जातो. छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक समूहाला कर्जवाटप केले जाते. जेणेकरून महिलांना अनेक व्यवसाय करू शकतात. उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत भगुर येथील चैतन्य महिला बचतगट यांना ९ लाख २० हजार रुपयांचे कर्ज आज वाटप करण्यात आले.
(Economi) यावेळी पंचायत समितीचे अधिकारी दिपक अवांतकर, फिरोज सय्यद, गौरव मकासरे, रावसाहेब भोरे, दिनेश काशीद, शुभम म्हस्के, दिपक लोंढे, भगुर गावच्या सिआरपी परवीन शेख समूहाच्या अध्यक्षा अनिता बारगळे, सचिव लताबाई मुरदारे, शाखेचे प्रमुख रमाकांत कांबळे, सहाय्यक ऋषिकेश काळे, भारत सोनवणे तसेच समूहातील सर्व महिला उपस्थित होत्या.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर