rip news: कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे 96 व्या वर्षी निधन - Rayat Samachar
Ad image

rip news: कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे 96 व्या वर्षी निधन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

बेळगाव | १३ जानेवारी | प्रतिनिधी

(rip news) स्वातंत्र्य आंदोलनाचे साक्षीदार, संयुक्त महाराष्ट्र लढा ते आजवर झालेल्या सर्वच जनवादी लढ्यांमध्ये अग्रभागी असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, थोर स्वातंत्र्यसैनिक, ख्यातनाम विचारवंत, लेखक, संपादक कॉम्रेड कृष्णा मेणसे सोमवारी ता. १३ जानेवारी २०२४ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी बेळगाव येथे दुपारी ३ वाजता निधन झाले. रात्री ८ वाजता सदाशिवनगर, स्मशानभूमी, बेळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

(rip news) कॉ. कृष्णा मेणसे यांच्या निधनाने साम्यवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली. एक बुजुर्ग नेता चळवळीने गमावलेला आहे. मेणसे परिवाराच्या दुःखात सर्वजण सहभागी आहेत. अगदी अखेरच्या दिवसातही सद्यकालीन सामाजिक, राजकीय वास्तव समजून घेण्यात, नवे काही वाचनात त्यांचा खंड पडलेला नव्हता. अखेरचा अल्प आजाराचा पंधरवडा वगळता त्यांचा संपूर्ण आयुष्य म्हणजे उत्साही सकारात्मक जगण्याचा वस्तुपाठ होता. कॉ. कृष्णा मेणसे यांना अखेरचा लाल सलाम, अशी आदरांजली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे यांनी वाहिली.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

Share This Article
Leave a comment