latest news: आरोग्यसेवा घरोघर पोहोचविण्याचा 30 समाजसेवकांचा निर्धार - Rayat Samachar

latest news: आरोग्यसेवा घरोघर पोहोचविण्याचा 30 समाजसेवकांचा निर्धार

द साल्वेशन आर्मी बूथ हॉस्पिटलमधे संयुक्त बैठकीत निर्णय

रयत समाचार वृत्तसेवा
उपसंपादक | दिपक शिरसाठ

बूथ हॉस्पिटल देत असलेल्या अल्पदरातील उत्कृष्ट आरोग्यसेवा रूग्णांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

अहमदनगर | ५ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सेवाभावी काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय व अशासकीय सुमारे ३० प्रतिनिधींच्या संयुक्त विचार विनिमय बैठकीमध्ये इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल देत असलेल्या अल्पदरातील उत्कृष्ट आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. बूथ हॉस्पिटल व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन यावेळी मेजर देवदान कळकुंबे यांनी केले.

 

 मेजर देवदान कळकुंबे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना सन १९३९ पासून आरोग्यसेवेत असलेल्या बूथ हॉस्पिटल संदर्भात माहिती दिली.

 

(latest news) यावेळी ते म्हणाले, बूथ हॉस्पिटल या ठिकाणी मोफत डायलिसिस ही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत देण्यात येते. अत्यंत कमी खर्चात दर शनिवारी सर्व तपासण्या, विनामूल्य दातांची तपासणी, तसेच अल्प दरात एक्स-रे, सोनोग्राफी तसेच इतर अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असलेले ऑपरेशन थिएटर, तज्ञ डॉक्टर्स, अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन प्लांट, आरोग्यदायी वातावरण यांच्यासह सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. बूथ हॉस्पिटल हे गेले अनेक वर्ष सेवाभावी हॉस्पिटल म्हणून कार्यरत असून या ठिकाणी कोविड, टीबी, एचआयव्हीसारख्या अत्यंत दुर्धर आजारांवर रुग्णांना उत्तम सेवा देऊन चांगल्या कामाचा पायंडा पाडलेला आहे.latest news

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
येथे उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात. याचा लाभ घेता यावा यासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेणे, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, शाळा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेणे. गरीब वस्त्यांमध्ये नागरिकांचे आजाराबद्दलचे गैरसमज काढून योग्य आहार त्याचप्रमाणे विविध आजारांबद्दलची जनजागृती मेडिकलचे कॅम्प यांसारख्या विविध योजना राबविण्यात संदर्भात चर्चा केली. किशोरवयीन मुली व महिला यांच्यामधील आजारांचे प्रमाण जास्त असल्याने तसेच लहान मुले त्याचप्रमाणे संस्थांमध्ये दाखल असणारे निराधार किंवा विनाकुटुंब राहणारी मुले यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

 

नागरिकांमध्ये आजार होऊ नयेत. साथीच्या रोगांसारखे आजार पसरू नयेत यासाठी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय व त्याचप्रमाणे आजारी नागरिक, रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी बूथ हॉस्पिटल हे सदैव सहकार्य करीत आले आहे. येथून पुढे हॉस्पिटलच्या सेवा व नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा निर्णय उपस्थित असलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. बूथ हॉस्पीटल हे समाजातील तळागाळातील लोकांना त्याचबरोबर सर्वस्तरातील जनतेला सेवा देण्यास सदैव तत्पर आहे, असे कळकुंबे यांनी आश्वासन दिले.latest news

 

यावेळी दिशा संस्थेचे डॉ. आय.एस. पटेकर, एंजल पिस फाऊंडेशनचे प्रा. कांतीलाल पाटोळे, रूग्णमित्र नादिर खान, हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगारचे संजय सपकाळ, डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगावचे बाळासाहेब गायकवाड, बोल फाऊंडेशनचे जोसेफ पाटोळे, श्री अमृतवहिनी मानवसेवा प्रकल्पाच्या वैष्णवी मेडे व गायत्री बढदे, जिल्हा रुग्णालयाचे सतिश आहिरे, क्रांती फाऊंडेशनचे प्रा.डॉ.अशोक घोरपडे, स्नेहबंध फाऊंडेशनचे डॉ. उद्धव शिंदे, काच, कचरा, पत्रा, कष्टकरी कामगार पंचायतचे विकास उडाणशिवे, डेझ फाऊंडेशनचे सत्यशील शिंदे, रोटरी इव्हॅनजलिन मंशाच्या मर्लिन एलिशा, पीस फाऊंडेशनचे सॅम्युअल वाघमारे, सावलीचे अजिंक्य आंधळे, कॅटालिस्टस सोशल ॲक्शनचे विक्रम कानवडे, सोशल वर्कर फारुक शेख, महिला बचतगट प्रमुख फरिदा शेख, नवजीवन प्रतिष्ठानचे संदीप पडवळ, संगीता पवार, उर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे, IRDC चे गोरख धात्रक, उमेद सोशल फाउंडेशनचे सचिन साळवी, हरियालीचे सुरेश खामकर, शीतल शिंदे, सत्वशिला वाघमारे, मालिका साबळे सहभागी होते.

 चर्चेचे समायोजन महानगर पालिकेच्या निवृत्त अधिकारी व कार्यकर्त्या नीलिमा जाधव बंडेलु यांनी केले. मेजर ज्योती कळकुंबे यांनी आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन सूरज वंजारे, ब्रदर प्रविण साबळे, ब्रदर अमित पठारे यांनी प्रयत्न केले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment