पारनेर (प्रतिनिधी) २०.६.२०२४
अहमदनगरचे पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगकडे इतर दहा उमेदवारांसह ईव्हीएम व व्हीव्हीपॅट परीक्षणाची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश लंके म्हणाले, डॉ. सुजय विखे यांना अद्यापही पराभव मान्य होत नाही. त्यांनी आता तो स्वीकारला पाहिजे. पण विखे कुटुंबाला तसा इतिहास आहे. पूर्वी यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबीय अशाच पद्धतीने वागले होते.
ते पुढे म्हणाले, आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केली म्हणजे विखे यांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



