अहमदनगर (प्रतिनिधी) २०.६.२००२४
जिल्हा दूध संघाच्या जागेवर उभा राहिलेल्या इमारतीचे कम्पलिशियन सर्टिफिकेट घेण्यासाठी पाच कोटी रुपये भरण्याचे खोटे प्रमाणपत्र साईमिडास या कंपनीने महापालिकेकडे दाखल केले आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवले. ही बाब नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे निदर्शनास आली. पालिकेनेही मान्य केली. याबाबत तक्रारदारांनी आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत आगामी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असुन या प्रकरणी महानगरपालिकेने खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या साई मिडास कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल न केल्यास तक्रारदार आणि नागरिकांसह आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत आंदोलन करण्यात येईल, असे पत्र आमदार कडू यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी म्हटले की, सर्वसामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई केली जाते. आम्ही दिव्यांगांचे प्रश्न घेऊन पालिकेत गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि महानगरपालिकेत खोटे प्रमाणपत्र देऊन पाच कोटी रुपये बुडवणाऱ्या बिल्डरांवर कारवाई केली जात नाही. गुन्हे दाखल केले जात नाही. ही बाब लोकशाहीला घातक आहे. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंत बिल्डर यांना वेगळा न्याय याप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी वागत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला नाही तर कोणत्याही वेळी येऊन पालिकेत आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलेला आहे.
यावेळी श्रीदीप चव्हाण, संजय घुले, गालिब सय्यद साबीर भाई व इतर नागरिक उपस्थित राहतील, असे कळवले आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.