अहमदनगर | २७ ऑगस्ट | तुषार सोनवणे
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावचे Youth सुपुत्र महेश गोपीनाथ जिवडे यांची केंद्रिय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच मिनिस्टर ऑफ स्टेट पॉवर अँड न्यू & रिन्यूएबल एनर्जीचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सचिवपदी नुकतिच नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज रोजी पदाचा पदभार स्वीकारला.
महेश जिवडे हे केन्द्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षे अंतर्गत प्रशासकीय सेवेतील २००७ च्या बॅचचे अधिकारी. २००७ ते २०२३ त्यांनी आयकर विभागात विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांची जानेवारी २०२४ मध्ये भारत सरकारतर्फे नॅशनल डिफेन्स कॉलेज ६४ व्या कोर्ससाठी निवड झाली. NDC कोर्स साठीची निवड होणे हे अत्यंत खडतर मानले जात असून संपूर्ण जगभरातील पात्र अधिकाऱ्यांमधून अत्यंत मोजक्याच ३ ते ५ जागा भारतातील नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असतात. हा एक अत्यंत प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे ज्यात फक्त वन-स्टार दर्जाचे काही निवडक संरक्षण अधिकारी आणि भारत सरकारचे संयुक्त सचिव दर्जाचे नागरी कर्मचारी उपस्थित असतात. दरवर्षी, यूएस, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, यूएई आणि इतर यांसारख्या मैत्रीपूर्ण परदेशी देशांमधील निवडक २५ अधिकारी कोर्समध्ये सहभागी होतात. केवळ लष्कर, नौदल, हवाई दल आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांमधील सेवा देणारे ब्रिगेडियर समतुल्य अधिकारी आणि भारतीय नागरी सेवांमधील सहसचिव संचालक समकक्ष अधिकारीच या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात.
जानेवारी २०२४ पासून सुरु झालेल्या ४८ आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना दुसऱ्या देशातील संरक्षण सेवा आणि नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांसाठीचे धोरणे आणि कार्यपध्दती समजून घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिका येथे पाठविण्यात आले होते.
एनडीसी ही आशियातील प्रशिक्षित व कुशल अधिकारी घडविणारी अग्रणी संस्था आहे. २७ एप्रिल १९६० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नॅशनल डिफेन्स कॉलेज (NDC) चे उद्घाटन झाल्यापासून महाविद्यालयाची भूमिका मोठ्या प्रमाणात निर्णयक्षम प्रशिक्षित तज्ञ अधिकारी निर्माण करण्याची राहिली आहे.
आयकर विभागातील महेश जिवडे यांची कामगिरीही अत्यंंत ट कौतुकास्पद राहिली. सण २००७ ते २०१२ सहाय्यक आयुक्त तसेच २०१२ ते २०१६ उपायुक्त पदावर पुणे येथे काम करतांना त्यांना आयकर विभागातर्फे सलग चार वर्ष सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने पुरस्कार प्राप्त झाले आहे. नोटबंदीच्या काळात त्यांची बदली गुजरात मध्ये अहमदाबादला सहआयुक्त पदावर झाली. तिथेही त्यांनी अत्यन्त कुशलतेने परिस्थिती हाताळून प्रभावी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे २०२० मध्ये सरकारने त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी बढती केली. २०२१ पासून ते मुंबई येथे कार्यरत होते.
त्यांच्या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरांवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांच्या संस्काराला व समाजसेवेसाठीच्या कर्तव्य भावनेला देतात. शिघ्र कवियत्री विश्वमाता कुसुमताई जिवडे यांचे ते पुत्र असून आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषणतज्ञ नंदकुमार जिवडे व उद्योजक चंद्रकांत जिवडे यांचे बंधू होत.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.