नवी दिल्ली | ११ मे | प्रतिनिधी
(World news) पाकिस्तानसोबतच्या चार दिवसांच्या तणावपूर्ण लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी ता.११ मे रोजी त्यांचे एक्स अकाउंट लॉक केल्याचे समजते.
(World news) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना क्रूर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. उजव्या विचारसरणीच्या अकाउंटनी त्यांना “देशद्रोही” म्हटले आहे. भारताने पाकिस्तानसोबत केलेल्या ‘युद्धबंदी’साठी त्यांना दोषी ठरवले गेले. त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी शेअर केलेल्या जुन्या पोस्ट खोडून काढल्या आणि परदेशात शिक्षण घेत असलेल्या आणि म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासितांना कायदेशीर मदत पुरवल्याबद्दल त्यांच्या मुलीला लक्ष्य केले. हे अत्यंत वाईट आहे. उजव्या विचारसरणीचे त्यांच्यावर बुमरँग करत आहेत काय ? हा सवाल निर्माण झाला आहे.
अधिक माहितीसाठी वाचा : https://thewire.in/communalism/foreign-secretary-misri-locks-x-after-abuse-ceasefire
(World news) याविषयी माहिती देताना मिलिंद धुमाळे यांनी सांगितले, कुणीतरी खापर फोडायला पाहिजे होतं ते यांच्यावर फोडलं गेलं. जो बोया वही पाए, हे आहेत आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट पोस्ट प्रोटेक्टेड केले कारण आयटी सेल त्यांच्या मागे लागला आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इतकच नाहीतर मुलीला वाईट भाषेत ट्रोल केले जात आहे, देशद्रोही म्हटलं जात आहे. विक्रम केवळ अधिकारी आहेत,
सरकारचे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणे एवढेच त्यांचे काम आहे, आणि त्यांनी ते शांत आणि तेवढ्याच गांभीर्याने आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, अभिनंदन आणि आभार, पण नीच अंडभक्तांनी झालेल्या गोष्टीतून गेलेली लाज झाकायला कुणावर तरी खापर फोडायला संधी पाहिजे होती ती विक्रम यांच्यावर घेतली गेली, त्यांची मुलगी कुठे काय काम करते हे शोधून तिची माहिती फोन नंबर सार्वजनिक केले गेले. एवढ्यावरच अंडभक्त थांबले नाहीत. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनाही देशद्रोही म्हटले, आणि त्यांच्याही मुलीची माहिती पब्लिक डोमेनमध्ये आणली, इतकच नाहीतर त्यांची मुलगी मेधा जयशंकर यूएस सिटीजन असून अमीरखानची घटस्फोटीत पत्नी किरण राव यांच्याबरोबर पार्टी करत असलेले फोटो शेअर करत ट्रोल केले जात आहे, खरंतर हेच प्रचंड टोकाचे खच्चीकरण असते, जे आयटी सेलकडून करवून घेतले जात आहे, आणि जे प्रामाणिक देशप्रेमी लोक आपल्याच नागरिकांचा मृत्यू का झाला? त्याबद्दल चौकशी करा म्हणून याचिका करतात तेव्हा आपले कोर्ट धक्कादायकपणे हे मानसीक खच्चीकरण होईल असं म्हणून असे प्रश्न उडवून लावतात, तेव्हा या देशात कोणत्या शक्तींची सत्ता आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. एका कमेंटवरून विक्रम मिस्री हे काश्मिरी ब्राह्मण असल्याचे समजले. आपण त्यांच्यासोबत यावेळी उभं राहिलं पाहिजे. जर आयटीसेल कडून हे काम मुद्दाम करवून घेतले नसेल तर जो बोया वही पाए असं म्हणावं लागेल, जे पेरलं ते उगवलं आहे. एक मुद्दा एवढाच खरा आहे की हीच गोष्ट जर विरोधी पक्ष, प्रश्न विचारणारे देशप्रेमी नागरिक यांनी केली असती तर या लोकांनी लगेच त्यांना अटक केली असती. मात्र इथं तशी शक्यता दिसत नाही. या लोकांनी शहिद पत्नी हिमांशी नरवाल हिला देखिल सोडले नाही, कारण तिने यांच्या हिंदू-मुस्लिम अजेंड्याला सुरुंग लावला होता. काही ठिकाणी तर ढोबाल बद्दलसुद्धा कमेंट आहेत. एकूणच अपयशाची किंमत शेठ सोडून सर्वांना चुकवावी लागणार आणि दुसऱ्यांवर याचे खापर फोडून शेठला सेफ केले जाणार. आपण याच्या विरोधात ठामपणे उभे राहू, आपला देश आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणा याबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आणि विश्वास आहे. अधिकारी फक्त निर्णयाची अंमलबजावणी करत असतात, प्रत्यक्ष निर्णय घेणारे काय फक्त क्रेडिटसाठी आणि बळी गेलेल्या लोकांच्या शवावर “वोट मिलेगा क्या?” यासाठीच आहेत?
(World news) दरम्यान, आयएएस असोशिएशनने म्हटले आहे की, आयएएस असोसिएशन परराष्ट्र सचिव श्री विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबासोबत एकजुटीने उभी आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांवर अनावश्यक वैयक्तिक हल्ले करणे अत्यंत खेदजनक आहे. आम्ही सार्वजनिक सेवेची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमच्या वचनबद्धतेसाठी कटीबद्ध आहोत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.