तंत्रज्ञान | ७ सप्टेंबर | रयत समाचार
(World news) आपल्या कुटुंबातील जुन्या पिढ्यांच्या आठवणींच्या स्वरूपात अनेक कृष्णधवल छायाचित्रे आपल्या घरात आजही जपून ठेवलेली असतात. ही छायाचित्रे हा एक दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, जर याच कृष्णधवल छायाचित्रांना रंगीत रूप दिले तर ती अधिकच जिवंत आणि भावस्पर्शी वाटतात.
(World news) आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गोष्ट अगदी सोपी झाली आहे. आपल्या स्मार्टफोनवर ChatGPT ॲप डाऊनलोड करून आपण सहजपणे कृष्णधवल फोटो रंगीत करू शकता. प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. ॲप उघडा आणि New Chat या पर्यायावर क्लिक करून आपल्याकडील जुना फोटो अपलोड करा. त्यानंतर पुढील सूचना द्या –
“Restore a damaged photograph by enhancing its quality, repairing tears, and correcting colors. Focus on preserving the original details while removing any blemishes or marks. Multimedia tools may be referenced, such as photo editing software. add rgb colour. make realistic.”
(World news) काही क्षणांतच ॲप आपल्याला सुधारित व रंगीत फोटो उपलब्ध करून देईल. ही सोपी व परिणामकारक माहिती रयत समाचारच्या तंत्रज्ञान टीमसाठी आमचे सिनिअर सहकारी मितेश ताके यांनी दिली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
