वॉर्सा (पोलंड) | ९ जुलै | प्रतिनिधी
(World news) कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी काल वॉर्सा येथील माँटे कॅसिनो युद्धस्मारकाला भेट देत द्वितीय महायुद्धातील शूरवीर सैनिकांना अभिवादन केले.
(World news) याविषयी छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, “द्वितीय महायुद्धात अभूतपूर्व शौर्य गाजवलेल्या सैनिकांच्या, विशेषतः मराठा लाइट इन्फंट्रीच्या बलिदानाची साक्ष देणारे हे युद्धस्मारक भारताच्या सैन्यपरंपरेचा गौरवशाली वारसा जपते.”
(World news) याठिकाणी उभारण्यात आलेला फलक भारत आणि पोलंडमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतीक असून, ही मैत्री केवळ लष्करी सहकार्यातून नव्हे तर मानवतेच्या मूल्यांतून साकारलेली आहे. युद्धकाळात पोलंडमधून निर्वासित झालेल्या अनेक पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने वळिवडे गावात आसरा दिला होता. हा सहकार्याचा आणि मानवतेचा धागा आजही टिकून आहे.
युवराज संभाजी महाराज व युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण करत युद्ध, निर्वासन व पुनर्बांधणी या त्रासदायक प्रक्रियेतून गेलेल्या सर्वांचा सन्मान केला.
कार्यक्रमाला भारताच्या पोलंडमधील राजदूत मा. नगमा मल्लिक यांचीही उपस्थिती लाभली. या भेटीतून भारत आणि पोलंडमधील दीर्घकालीन मैत्री, सहकार्य आणि मानवतेच्या अधिष्ठानावर उभ्या असलेल्या संबंधांचे पुनःस्मरण करण्यात आले.
युवराज संभाजी महाराज पुढे म्हणाले की, “धोरणे आणि करार हे केवळ संबंधांचे औपचारिक रूप आहेत, पण खरी मैत्री आणि सहकार्य संकटकाळात दाखवलेल्या धैर्य, सहवेदना आणि सद्भावनेतून आकार घेतात. हे स्मारक त्याचे जिवंत उदाहरण आहे.”
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.