World news |’कारवान बुक अवॉर्ड’ ची लाँग-लिस्ट 23 रोजी होणार जाहीर; 2026ची नोंदणी सुरू; अंतिम तारीख 31 जानेवारी 2026

उपसंचालक | दिपक शिरसाठ

मुंबई | २२.११ | प्रतिनिधी

(World news) ‘कारवान बुक अवॉर्ड- २०२५’ साठीची लाँग-लिस्ट उद्या, रविवारी ता. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता जाहीर केली जाणार आहे. भारतीय उपखंडाच्या इतिहासावर आधारित उत्कृष्ट नॉन-फिक्शन पुस्तकांची ही यादी YouTube @karwaanheritage या चॅनेलवर LIVE स्वरूपात प्रसारित होणार आहे, अशी माहिती कारवान हॅरिटेज‘चे संस्थापक इशान शर्मा यांनी दिली.World news

(World news) अधिक माहिती देताना शर्मा म्हणाले, तसेच कारवन हेरिटेजतर्फे ‘कारवान बुक अवॉर्ड २०२६’ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. पुस्तक जमा करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे. या पुरस्कारासाठी पुस्तके प्रकाशकांकडूनच स्वीकारली जाणार असून, पुस्तके ता. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित झालेली असणे आवश्यक आहे. पुस्तके मूळ इंग्रजी भाषेतील आणि एकाच लेखकाची असावीत. मार्गदर्शक तत्त्वांसाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती कारवानचे संस्थापक इशान शर्मा यांनी दिली.

World news

(World news) दरम्यान, कारवान बुक अवॉर्ड २०२५ साठीचे परीक्षक मंडळही जाहीर झाले आहे. यामध्ये श्रध्दा कुंभोजकर, दिलीप मेनन, सुचेता महाजन, रक्षंदा जलील, संगीता दासगुप्ता, कानद सिन्हा आणि यांचा समावेश आहे. इतिहास, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास क्षेत्रातील हे मान्यवर तज्ज्ञ यंदाच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत.

 

Share This Article