त्वचा आरोग्य शिबीर
अहमदनगर | १३ जुलै | प्रतिनिधी
(World news) देशभरात IADVL (इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट्स) या संघटनेच्या वतीने एकाच दिवशी मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा भाग म्हणून अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरवलेले शिबिर यशस्वी ठरले, असल्याची माहिती अहिल्यानगर डर्माटोलॉजी सोसायटीचे सचिव डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी दिली.
(World news) या शिबिराची संपूर्ण जबाबदारी डॉ. पूनम विधाते, डॉ. मिथिला गाडेकर व डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी सांभाळली. शिबिरामध्ये १३२ गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना मोफत औषधे देण्यात आली. काही रुग्णांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेची सोय देखील करण्यात आली. IADVL या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून कॉस्मेटोलॉजीच्या अल्पमुदती कोर्सवर उपचार करणाऱ्या तथाकथित डॉक्टरांविरोधात जनजागृती करण्यासाठी हाच खरा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
(World news) शिबिरात विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. डॉ. त्रिपाठी, डॉ. बक्षी, डॉ. तुरळे, डॉ. पाटील, डॉ. गुप्ता यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला तसेच डॉ. भास्कर पालवे, डॉ. अमित शिंदे, डॉ. आशुतोष गारुडकर यांच्यासह इतर तज्ञ डॉक्टरांनीही रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावली.
सिव्हिल सर्जन डॉ. घोगरे, डॉ. बापूसाहेब गाडे व सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फार्मा कंपन्यांसह (अल्केम, टोरंट, कॅनिक्सा, इंटास) स्थानिक वृत्तपत्र, वार्ताहर व हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे ही वाचा : Womens Power|वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.